शिरगांवकर बीच रिसॉर्टचे दिमाखात उद्घाटन

वडील मधुकर शिरगांवकर यांच्या हस्ते शुभारंभ ; उद्योजक संतोष शिरगांवकर यांची यशस्वी भरारी

भव्य आलिशान वास्तू पर्यटकांच्या सेवेत ; मित्रपरिवार व मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अमित खोत | मालवण : मालवणच्या पर्यटन समृद्धीत आणखी एका दिमाखदार वास्तूची भर पडली आहे. मालवण बंदर जेटीजवळ उद्योजक संतोष शिरगांवकर आणि परिवाराने उभारलेल्या ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’चे उदघाटन वडील मधुकर शिरगांवकर यांच्या हस्ते रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. आई-वडील, कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

आजी, वडील-आई आणि संपूर्ण परिवाराच्या कष्ट, त्याग आणि आशीर्वादातून सुरू झालेला हा प्रवास आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचला. आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांच्या साथीने उभ्या राहिलेल्या या स्वप्नवत वास्तूचे उद्घाटनही वडील-आई व परिवाराच्या हस्ते होणे, हा क्षण शिरगांवकर कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा ठरला.

उद्योजक संतोष शिरगांवकर यांनी आधुनिक सुविधा आणि आलिशान वास्तुरचनेने साकारलेले हे रिसॉर्ट मालवणमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार निवासाचा नवा पर्याय ठरणार आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात उभारलेली ही भव्य वास्तू आकर्षक बाह्यरचना, आलिशान अंतर्गत सजावट, प्रशस्त सुविधा आणि आरामदायी वातावरणामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’मध्ये २२ आलिशान रूम, बाथटबसह २ विशेष सूट, रेस्टॉरंट तसेच ४० ते ५० व्यक्तींच्या क्षमतेचा प्रशस्त बँक्वेट हॉल उपलब्ध आहे. याशिवाय जनरेटर बॅकअप, वाय-फाय, लिफ्ट, प्रशस्त पार्किंग यांसह पर्यटकांच्या सोयीसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मालवणमध्ये दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. वाढत्या पर्यटनाचा विचार करून पर्यटकांना आलिशान निवास, दर्जेदार सुविधा, उत्तम आदरातिथ्य आणि प्रसन्न वातावरण मिळावे, या उद्देशाने या रिसॉर्टची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे मालवणच्या पर्यटन क्षेत्राला आधुनिकतेची जोड देणारा हा नवा उपक्रम ठरणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त तसेच आयोजित श्री सत्यनारायण पूजे निमित्त मित्रपरिवार, मान्यवर, नागरिक तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहून उद्योजक संतोष शिरगांवकर व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’च्या माध्यमातून मालवणच्या पर्यटन क्षेत्रात आणखी एक आकर्षक आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी उद्योजक संतोष शिरगांवकर यांचे वडील मधुकर शिरगावकर, आई मधुमती शिरगावकर, काकी सुमती शिरगावकर भाऊ हेमंत शिरगावकर, पत्नी सुजाता शिरगावकर, वाहिनी पुजा शिरगावकर, मुलगा शुभम शिरगावकर, पुतण्या वेदांत शिरगावकर यांसह बाळा खडपे, चेतन पांजरी, दिपक नाईक, पॉल फर्नांडिस, दादा मंडलिक यांसह मित्र परिवार, मान्यवर, नागरिक उपस्थित होते.