आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांचा रामेश्वर संस्थानकडून सन्मान

आचरा | अर्जुन बापर्डेकर
आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, यांची सदिच्छा भेट घेऊन *विश्वस्त इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे* यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी आचऱ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा झाली. विश्वस्त ऍ शिल्पन गांवकर यांनी आचऱ्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय समर्थपणे त्यांच्यासमोर मांडले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कातीवले यांनी सर्व तोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

यावेळी न्यासाचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी, सचिव श्री संतोष मिराशी, खजिनदार श्री कपिल गुरव, विश्वस्त श्री संजय मिराशी, एड. शिल्पन गांवकर व श्री मंगेश मेस्त्री, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ,टेंबूलकर आदी उपस्थित होते.