सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव देऊळवाडी येथील ज्येष्ठ महिला सौ. सुमित्रा दशरथ मळगावकर (वय ६३) यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. सुमित्रा मळगावकर या सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आपल्या पुतणी सोबत गॅस सिलेंडर आणण्यासाठी निघाल्या होत्या. वाटेत जात असताना अचानक त्यांचा पाय घसरून त्या खाली पडल्या तसेच या त्यांना वाटेतच तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
घटनेनंतर तातडीने त्यांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात .पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे उपस्थित डॉक्टरांनी तपासून घोषित केले. या घटनेची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे.
सौ. सुमित्रा मळगावकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारात शोकाकुल वातावरण पसरले आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणी आणि पुतण्या असा परिवार आहे.













