चिपळूण (प्रतिनिधी) : भ.क.ल. वालावलकर रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय श्रीक्षेत्र डेरवण येथे निसर्ग सानिध्यात आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी लोकांचा एक मोठा समुदाय वैद्यकीय उपचार आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी सेवाभावी वृत्तीने सक्रिय आहे. फक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कॅन्सर सर्जरी, केमोथेरपी, अद्ययावत रेडिएशन थेरपी, पेट स्कॅन, ऍंजीओग्राफी, ऍंजिओप्लास्टि, बायपास, पेस मेकर, दुर्बीणीद्वारे सरकलेल्या चकतीवरील शस्त्रक्रिया, सांध्यावरील शस्त्रक्रिया, गुढघे आणि खुबा बदलण्यासाठी शस्त्रक्रिया, मेंदूतील रक्तस्त्राव, मेंदूतील गाठी, ब्रेन टयुमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील टयुमर वरील शस्त्रक्रिया, मुतखडे, प्रोटेस्ट ग्रंथी, डायलिसिस सुविधा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नाकाचे हाड वाढणे, सायनस शस्त्रक्रिया, कानाच्या हाडाची शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, अश्रू पिशवीची शस्त्रक्रिया, टॉन्सिल, नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी अशा विविध प्रकारच्या आजार, व्याधी तसेच रोगांवरील वैद्यकीय उपचारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आहेत. या खेरीज अरुण कुरकुरे योजनेअंतर्गत या रुग्णांना कॅन्सल सदृश्य लक्षणे व गाठी आहेत अशा गुणांना 25 हजार रुपयांपर्यंत मोफत निदानाच्या चाचण्या करता येतात.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने डेरवण येथे रुग्णालयाबरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रमही चालविले आहेत. इंग्रजी माध्यमाची बारावीपर्यंत शिक्षण देणारी सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि अल्प मुदतीचे विविध वैद्यकीय कौशल्ये शिकविणारे अभ्यासक्रम असणारे कॉलेज ऑॅफ एडव्हान्स्ड स्टडीज याद्वारे विद्यार्थ्यांना अनेक व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी डेरवण येथे उपलब्ध आहे. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश शासन-नियम व गुणवत्तेनुसारच दिले जातात. संस्थेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सोय आहे. सर्व विद्यार्थ्यांना तज्ज्ञ अध्यापकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते. या व्यतिरिक्त संस्थेमध्ये स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या अनेक सेवाभावी मातब्बर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभते. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाच्या जोरावर अनेक सामाजिक व वैद्यकीय संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत बा पूर्वीच्या बॅचेसचा निकाल सर्वसाधारणपणे शत-प्रतिशत आहे व अनेक विद्याथों प्रथमश्रणात उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण झालेले बहुतेक सर्व विद्यार्थी अनेक शासकीय व नामवंत खाजगी संस्थांमध्ये चांगल्या पदांवर काम करत आहेत.
येथील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व जगाच्या नव्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहेत. या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना भारतात व परदेशात भरपूर मागणी आहे. तसेच शासकीय किंवा नामवंत खाजगी संस्थांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्वयंरोजरासाठीही हे अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. संस्थेच्या रुग्णालयामध्ये व इतरकल्पांमध्ये गरजेनुसार विद्यार्थ्यांना सेवेत सामावून घेतले जाते. संस्थेचे अनेक विद्यार्थी या आसपासच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये, शासकीय रुग्णालयांमध्ये, शासनाच्या अनेक आरोग्यप्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत. काही विद्यार्थ्यांना केंद्रशासनाच्या रेल्वे व संरक्षण यासारख्या विभागांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. हिंदुजा, नानावटी, फोर्टीस, कोकिलाबेन, लीलावती व दीनानाथ मंगेशकर या सारख्या नामांकित रुग्णालयांमध्ये संस्थेचे अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. सदर अभ्यासक्रमामुळे निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना भविष्य घडविण्यास नवी दिशा मिळाली आहे.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट फक्त श्रेष्ठ कमलाकर लक्ष्मण वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रम शिकवले जातात. बारावी विज्ञान आणि नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस आज साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम आणि एक वर्ष इंटर्नशिप बीपीटीएच फिजिओथेरपी हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आणि सहा महिने इंटर्नशिप आणि बीएससी नर्सिंग हे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. या खेळीत बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक मेडिकल सायन्स टेक्निशियन, बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इंडॉस्कॉपी, बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कम्युनिटी मेडिसिन टेक्निशियन, बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस टेक्निशियन हे तीन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम असून एक वर्ष इंटरशिप करावी लागते.
सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी टेक्निशियन, सर्टिफिकेट कोर्स इन इसीजी टेक्निशियन, सर्टिफिकेट कोर्स रेस्पायरेटरी थेरेपिस्ट, सर्टिफिकेट कोर्स इन अनेस्थेशिया टेक्निशियन हे एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन क्रिटिकल केअर डायलिसिस आणि सर्टिफिकेट कोर्स इन ऑॅपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याशी संलग्न तंत्र शिक्षण अभ्यासक्रम देखील येथे शिकवले जातात. यामध्ये ऍडव्हान्सड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम बीएससी, बीएएमएस, बीएचएमएस, बीव्हीएससी, बीपीटीएच, एलसीएचसी, डीएचएमएस व तत्सम शैक्षणिक पात्रता धारकांसाठी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ इंडियन व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि एम एस बी एन पी इ संलग्न अभ्यासक्रम ए एन एम (एक्झिलरी नर्सिंग ऍंड मिडवायफरी) कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण २० विद्यार्थ्यांसाठी दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम, जीएनएम (जनरल नर्सिंग ऍंड मिडवायफरी) बारावी विज्ञान शाखेच्या ६० विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम, पीबी बीएससी नर्सिंग हा जी एन एम अथवा ए एन एम अभ्यासक्रम किमान ५० टक्केने उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. एम एस सी नर्सिंग हा पीबीबीएससी अथवा बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन एक वर्ष अनुभव असलेल्या २३ विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे.
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिटयूट ऑॅफ कबीर एज्युकेशन ऍंड डेव्हलपमेंटच्या सहयोगाने समर्थ एज्युकेशनल इन्स्टिटयूट मध्ये बीएससी इन बायो मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन हा बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. बीएससी इन सायकॉलॉजिकल हेल्थ ऍंड बिहॅवियरल सायन्स हा बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. एम एस सी एन बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन हा बीएससी इन बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. एमएससीइन क्लीनिकल सायकॉलॉजी बीएससी सायकॉलॉजी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे.
या खेरीज, श्री विठ्ठलराव जोशी चैरिटी ट्रस्ट व वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने टेलरिंग ऍंड फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षण आणि जनरल डयुटी सहाय्यक हे किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भ.क.ल. वालावलकर रुग्णालय, ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, फिजिएथेरपी कॉलेज, न्यूक्लिअर लॅब, हॉस्टेल, लायब्ररी ऍंड रीडिंग हॉल, मेस हॉल, स्पोटर्स कॉम्प्लेक्स अशा अनेक विविध इमारती असलेल्या डेरवण परिसरामध्ये शिवसमर्थ गड व महाराष्ट्रातील पहिली शिवसृष्टी, डेरवण मठ, राजावाडी धरण, परिसरातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा योजना या खेरीज विविध शासकीय वैद्यकीय सुविधा व सवलती योजनांच्या व्यतिरिक्त अतिशय गरीब तसेच क्लिष्ट आजार तसेच जखमींसाठी उद्योगपती वालावलकर यांच्या माध्यमातून अधिकच्या सवलती देखील देण्यात आलेल्या आहेत. श्रीसंत दिगंबरदास महाराज आणि भक्त श्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये असलेल्या सावर्डे कासारवाडी लगतच्या डेरवण परिसराला आता वैद्यकीय क्षेत्राचे मुख्य स्रोत असल्याचे स्वरूप आध्यात्मिक, सामाजिक तसेच शैक्षणिक व महिला सक्षमीकरण बांधिलकीतून निर्माण होऊ लागले आहे.













