कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी १ च्या सुमारास मगरीला जेरबंद
भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेले बचावकार्य आज दुपारी संपले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
विवो: वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.मात्र पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.













