वडाचापाट ग्रामपंचायतीत १३० जणांचे काढले एसटी स्मार्ट कार्ड!

▪️राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर :वडाचापाट ग्रामपंचायत येथे एसटी प्रवास मोफत स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 130 लाभार्थ्यांची स्मार्ट कार्ड काढण्यात आली. राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राकेश परब यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई आणि सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या हस्ते राकेश परब यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. वडाचापाट गावच्या विकासात्मक वाटचालीत राकेश परब यांचे योगदान लाभत असल्या बद्दल राजेंद्र प्रभुदेसाई यानी आभार मानले. यावेळी कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यानी राकेश परब यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, ग्रा. सदस्य विराज पाटकर, सविता पालव, सोनल मांजरेकर, वेदिका माळकर, विनायक प्रभुदेसाई, उद्योजक दयानंद देसाई, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रथमेश पालव, ग्रामस्थ श्रीकांत पाटकर, अभिमन्यू पालव, रामचंद्र कासले, चेतन पाटकर, दीपक मांजरेकर आदी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दया देसाई मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.