इन्सुली येथे २७ रोजी जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तथा शिक्षण समिती तज्ज्ञ सदस्य ‘श्री गुरुनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत’ जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली असून सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री. प्रमोद कामत भूषवणार आहेत. तर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षण व आरोग्य सभापती माननीय श्री. प्रितेश राऊळ यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष श्री. महेंद्र शिवाजी सावंत यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सल्लागार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथील मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व नागरिक, पालक आणि शिक्षणप्रेमींनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे सस्नेह निमंत्रण व आवाहन करण्यात आले आहे.