मसुरे | झुंजार पेडणेकर :पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून गावातील हळद लागवड पिकाची वैभववाडी खांबाळे येथील प्रगतशील शेतकरी
श्री.मंगेश कदम यांनी पाहणी केली. कदम यांनी प्रथमता सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांची तळमळ पाहून समाधान व्यक्त केले. त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या हळद लागवड क्षेत्राची पाहणी केली. तसेच जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी उपाय योजना सांगितल्या. दरवर्षी उत्पन्न किती येते याबाबत देखील शेतकऱ्यांशी संवाद साधला. खताचे प्रमाण, कोणते खत वापरावे या अशा पूरक गोष्टी शेतकऱ्याना सांगितल्या. यावेळी सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.सत्यवान तेजम,श्री.तुकाराम सावंत, श्री.मेघश्याम जुवेकर,श्रीम. रतिका गोलतकर, सौ.उर्मिला जुवेकर, सौ. आरती परब, सौ. जयश्री परब, श्री.अथर्व गोलतकर इत्यादी उपस्थित होते. मार्गदर्शन संपल्यानंतर सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचे आभार मानले त्यानंतर उपस्थित शेतकरी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.













