आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
स्वप्निल कदम-कुडाळ :
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य ऑटो रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नारळी पौर्णिमेच्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच तमाम शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन नारळी पौर्णिमेचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या रॅलीचे निमंत्रक म्हणून शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे व दिपक नारकर यांनी नियोजन केले आहे. रॅलीत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













