सावंतवाडी:
अटल प्रतिष्ठानच्या वतीने आणि स्व. महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ डॉ. अमुल पावसकर व डॉ. नितीन पावसकर यांच्या प्रायोजकत्वाने जिल्हास्तरीय संस्कृत श्लोकपठन, कथाकथन व गीतगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा शैक्षणिक उपक्रम रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे सकाळी १०:०० ते दुपारी १:३० या वेळेत पार पडणार आहे.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. श्रद्धा राजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, दै. सकाळ सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख श्री शिवप्रसाद देसाई, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका श्रीमती सुलभा कशाळीकर आणि युवा उद्योजक श्री बाबा टोपले आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थी व भाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर व कार्यवाह रघुनाथ तानावडे यांनी केले आहे.













