रो. दिलीप म्हापसेकर यांना मातृशोक

लक्ष्मी म्हापसेकर यांचे ९२ व्या वर्षी निधन
​सावंतवाडी:
देवगड व कॅसलरॉक येथील नामांकित घराण्यांशी नातेसंबंध असलेल्या आणि वाचन-संगीताची आवड जपणाऱ्या लक्ष्मी झिलू म्हापसेकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी बेळगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने म्हापसेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
​कै. लक्ष्मी म्हापसेकर या मूळच्या देवगड येथील पारकर कुटुंबातील होत्या. तत्कालीन काळात त्यांनी ‘एसएससी’ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांना वाचनाची व संगीताची विशेष आवड होती. त्यांचा विवाह कर्नाटकातील कॅसलरॉक येथील रहिवासी असलेले कै. झिलू म्हापसेकर यांच्याशी झाला होता.
​त्यांच्या पश्चात रो. दिलीप म्हापसेकर आणि संदीप म्हापसेकर ही दोन मुले, सुना, नातसून, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सावंतवाडी व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.