रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी अरांक्षा यादव यांची नियुक्ती

रत्नागिरी:
रत्नागिरी उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) पदी २०२३ च्या बॅचच्या परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २५ ऑगस्ट रोजी या पदस्थापनेचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथील ‘Phase II Training of Basic Course (74 RR)’ हे संस्थात्मक प्रशिक्षण पूर्ण करून त्या महाराष्ट्र संवर्गात रुजू होत आहेत. त्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
गृह विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार, राज्यातील १२ परिविक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांना विविध उपविभागांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी उपविभागाची धुरा आता अरांक्षा यादव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.