चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालय (स्वायत्त) चिपळूण नेचर क्लब आणि ईको क्लब आयोजित “संशोधनाला कोण, कसे आणि काय आकार देते?” सरपटणारे आणि उभयचर प्राणी यांच्यावर अभ्यास करणारे, भारतीय मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हे व्याख्यान होईल.
डॉ. गिरी यांचा निसर्ग संशोधन यामध्ये दांडगा अनुभव आहे. ज्यांनी भारतात ५८ प्रकारच्या नविन जातींचा शोध लावला आहे. आणि रिलायन्स फाऊंडेशन मध्ये मुख्य संशोधक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन व संरक्षण यांची आवड निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयात निसर्ग मंडळ व इको क्लब कार्यरत आहे. या विभागातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या निमित्ताने निसर्ग संशोधक डॉ शरद गिरी यांचे २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सर्व विद्यार्थी व निसर्ग प्रेमी यांच्यासाठी खुला आहे. या व्याख्याना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.माधव बापट, वरिष्ठ महाविद्यालय निसर्ग मंडळ समन्वयक डॉ. हरिदास बाबर, कनिष्ठ महाविद्यालय इको क्लब समन्वयक प्रा.योगेश आगवेकर यांचे वतीने करण्यात आले आहे.












