बांदा : प्रतिनिधी
नुकत्याच अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र १७ वर्षाआतील मुलगे या स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने बाजी मारली. सिंधुदुर्ग संघामध्ये बांदा व्ही. एन. नाबर प्रशालेचा विदयार्थी रुद्र नारायण मोरजकर याची निवड झाली होती. अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या संपूर्ण स्पर्धेत त्याला तीन सामनावीर व स्पर्धेचा मालिकावीर किताब देऊन गौरविण्यात आले.
त्याच्या यशाबद्दल चेअरमन मंगेश कामत, गव्हर्निंग कौन्सीलचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील दिवाकर नाटेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. त्याला क्रीडा शिक्षक प्रशांत देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.













