जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची पाहणी….
घटनेमागे कोणत्याही प्रवृत्ती चा हात असल्यास त्यादृष्टीने तपास व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधणार…..
पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई साठी शासन स्तरावर पाठपुरावा करू
मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथे शुक्रवारी रात्री
रापणीची जाळी, होड्या आणि मासेमारीचे अन्य साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाल्याच्या घटनेची भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या कांदळगावर कुटुंबियांना दिलासा दिला.
आगीच्या घटनेमागे कोणत्या ही प्रवृत्तीच्या हात असले तर त्याची सखोल चौकशी होण्यासाठी आणि नुकसानी बाबत शासनस्तरावरून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले.
यावेळी मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, पंकज सादये, शाम झाड, केदार झाड, संदीप बोडवे, जयवंत सावंत, मिलिंद झाड, मोहन कुबल, सुरेश बापार्डेकर, यांसह गुंडू कांदळगावकर, अनिल टिकम, साई लोणे, राजाराम खराडे, दयानंद कुबल, रामचंद्र कांबळी, चेतन सारंग, पिंटो टीकम, बाबली कांदळगावकर, सुहास केळुसकर, कुंदन धुरत यांसह अन्य उपस्थित होते.
सावंत म्हणाले, कांदळगावकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून मच्छीमार समाजात हळहळ व्यक्त होत आहे. कष्टाने उभा केलेला मासेमारीचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कांदळगावकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असावी, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगीमागचे नेमके कारण काय, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. मच्छिमारांच्या या मागणीकडे आम्हीं सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत.
आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या दुर्देवी घटनेची चौकशी व्हावी यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक याचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
तारकर्ली वरचीवाडी येथील कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एक होडी पूर्णपणे जळून खाक झाली, तर दुसरी होडी अर्धवट जळाली. या घटनेमाग कोणत्यातरी वाईट व प्रवृत्तीचा हात असल्याचे संशय कांदळगावकर कुटुंबीयांनी व्यक्त केला. यापूर्वी सुद्धा अशीच आगी ची घटना घडली होती. त्यात आमच्या नौकेचे आणि जाळ्यांचे नुकसान झाले होते. आता सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली असून पोलीस प्रशासनाने या घटनेमागे कोणत्यातरी वाईट प्रवृत्तीचा हात आहे, या दृष्टीने तपास करावा. घटनास्थळावरचे मोबाईल लोकेशन तपासण्यात यावेत अशी मागणी कांदळगावकर कुटुंब यांनी केली.













