गुहागर प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाच्या गुहागर महिला तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, नगरसेविका तसेच महिला कार्यकर्त्यांच्या वतीने गुहागर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेट देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी गुहागर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय तसेच नगरपंचायत येथे जाऊन अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजाच्या सुरक्षेसाठी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्यासाठी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये आपुलकीचे व बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.नेहमीच भाजप महिला आघाडीच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात असे गुहागर महिला तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर यांनी सांगितले. यावेळी स्मिता जांगळी, नगरसेविका अनुषा भावे, सुश्मिता रहाटे, विशाखा सोमण, प्रतीक्षा जांगळी यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.













