भातशेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल.
ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे परिसरात सध्या जंगली जनावरांनी हैदोस घातला असून आधीच पावसाने उशीर केल्याने शेतीला विलंब झाला कसबस शेत उभं केल आणि आता जे काय पिकवल त्याची नासधूस जंगली जनावरे करत आहेत. जंगली जनावरांची वाढती दहशत सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहेत.या परिसरात गव्यांनी शेतीची नासधूस करायला सुरुवात केली असून उभी पिके फस्त करण्याबरोबर नासधूसही मोठ्याप्रमाणात करत आहेत. ओटवणेतील इतर परिसरापेक्षा कापइवाडी भाग हा जंगल परिसरा जवळ असल्याने जंगली जनावरांचा वावर ओटवणे कापईवाडी परिसरात मोठया प्रमाणात असतो त्यामुळे या भागात जंगली जनावरे शेतीची नासधूस मोठ्याप्रमाणात करीत आहेत. जंगली सांभरांच्या बरोबर गव्यांची वाढती संख्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गाय म्हैस या पाळीव जनावराप्रमाणे बिनधास्त हे गवे शेतीपिकात चरत आहेत. कापईवाडी येथिल शेतकरी नागेश गावकर यांची एका रात्रीत 10 कोपऱ्यातील शेतीच पूर्ण पीक गव्याने उध्वस्त केल वन विभागाने याची पाहणी करून जंगली प्राण्याच्या बंदोबस्ता बरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.













