तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अमित सावंत यांची निवड 

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अमित सावंत यांची निवड करण्यात आली. प्रशासक सरपंच अंजली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड झाली. माजी अध्यक्ष मनोज सावंत यांचा सरपंच सावंत यांनी सत्कार केला. तंटामुक्त समितीमध्ये सरपंच अंजली सावंत, दशरथ मुणगेकर, साक्षी गुरव, धर्माजी आडकर, मनोज सावंत, अरविंद सावंत, पत्रकार विश्वास मुणगेकर, अजित रासम, शामसुंदर लब्दे, विश्राम मुणगेकर, योगेश लब्दे, कामिनी परब, अमित सावंत, नीतेश पडवणकर, लक्ष्मी मुणगेकर, दुर्गा परब, मुणगे पोलिसपाटील साक्षी सावंत, आडबंदर पोलिसपाटील तुषार आडकर, पदसिद्ध सदस्य म्हणून ग्रामपंचायत सदस्य, वायरमन प्रतिनिधी, डॉक्टर प्रतिनिधी, हायस्कूल शाळा प्रतिनिधी आदींचा समावेश करण्यात आला. अध्यक्ष अमित सावंत यांचे सरपंच अंजली सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.