लांजा महाविद्यालयाच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी पटकावला सांघिक चषक
लांजा (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत लांजा महाविद्यालयाने सुयश मिळवले असून महाविद्यालयाच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी सांघिक चषक पटकावला.
रत्नागिरी येथील नवनिर्माण कॉलेजमध्ये मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शनिवारी पार पडल्या. या स्पर्धेत लांजा महाविद्यालयाच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी सांघिक चषक पटकावला. अथर्व पाध्ये याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. लांजाच्या या संघात अथर्व पाध्ये, सानिया यादव, सोनाली कदम आणि सोनाली गोरे यांचा सहभाग होता.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर सुवर्णा देऊस्कर पाटील, सर्व प्राध्यापक वर्ग, न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा चे अध्यक्ष जयवंत शेट्ये , सचिव महेश सप्रे व सर्व पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले













