लांजा ( प्रतिनिधी): मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरीच्या पदाधिकारी यांची बैठक नुकतीच रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
“मुस्लिम समाज विकास संघ जिल्हा रत्नागिरी” या जिल्हास्तरीय सामाजिक संस्थेचे लांजा तालुका प्रतिनिधी अकील नाईक यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे अध्यक्ष मुराद अडरेकर व सचिव महमंद हुसैन मूसा यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात ही भेट संपन्न झाली. या वेळी अकील नाईक यांच्यासह रत्नागिरीतील प्रतिष्ठित मोहसीन अ करीम मुल्ला, अ समद अ कुद्युस सोलकर, नाझीम हसनमियां मजगांवकर, सलमान रऊफ हाजू व सुहेल रफीक लाला हे उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी संस्थेची ध्येय उद्यिष्टे व आज पर्यंतच्या सामाजिक कार्याचा आढावा विस्ताराने विषद केला. दोन्ही बाजुनी सकारात्मक विचारांचे आदानप्रदान होऊन संस्थेच्या ध्येय उद्यीष्टाना अनुसरून एक नवी दिशा देण्याची आश्वासक चर्चा झाली. संस्थेच्या विचारांशी समंत होऊन वरील चारही संस्थेचे आजीव सभासदत्व स्वीकारले. कार्यकारी मंडळाच्या पुढील सभेत यातील दोघांची निवड रत्नागिरी तालुक्यातील संस्थेचे “प्रतिनिधी” म्हणून करण्यात येईल असे अध्यक्ष व सचिव यांनी सुचीत केले.
बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.













