चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे संस्कृत सप्ताहानिमित्त तालुकास्तरीय संस्कृत कथाकथन स्पर्धा गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी व बारावी आणि इयत्ता तेरावीपासून पुढे सर्वांसाठी खुला गट अशा तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये चिपळूण तालुक्यातील ८ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व मोठ्या गटात विद्यार्थिनी व शिक्षिकांनी सहभाग घेऊन स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. कथाकथन स्पर्धेत स्पर्धकांनी गटानुक्रमे नियोजित कथांचे चांगल्या प्रकारे स्पष्ट उच्चारणासह सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षण चिपळूण येथील प्रसिद्ध कीर्तनकार सौ. आरती गोडसे आणि रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा, विश्वनाथ हायस्कूल लवेल येथील संस्कृत शिक्षिका सौ. स्मिता सरदेसाई यांनी केले.
या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी या विद्यालयीन गटात प्रथम क्रमांक- अवनी आशुतोष मराठे (रोटरी इं. मी. स्कूल, खेड) (आर्. सी. काळे विद्यालय, पेढे) द्वितीय क्रमांक- अवनीश अमित जोशी (एस्. पी. एम्. इं. मी. स्कूल, परशुराम) तृतीय क्रमांक- भार्गवी शंकर कानडे (आर. सी. काळे विद्यालय, पेढे), उत्तेजनार्थ क्रमांक – कादंबरी दीपक सुतार (एस्. पी. एम्. इं. मी. स्कूल, परशुराम) उत्तेजनार्थ क्रमांक – सुश्रुत ऋषिकेश महाजन (युनायटेड इं. स्कूल, चिपळूण) या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. तसेच या स्पर्धेत इयत्ता अकरावी आणि बारावी या कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक- अंतरा शिंदे (डी.बी.जे. महाविद्यालय) द्वितीय क्रमांक देण्यात आला नाही. तृतीय क्रमांक- राखी नलावडे (डीबीजे महाविद्यालय) यांनी प्राप्त केला. तसेच या स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक- सौ. देवकी चैतन्य खोत (संस्कृत शिक्षिका, मोरेश्वर आगवेकर हायस्कूल, अलोरे) द्वितीय क्रमांक – सौ. प्रीती संतोष जोशी (संस्कृत शिक्षिका, युनायटेड इं. स्कूल, चिपळूण) द्वितीय क्रमांक- श्रीमती पूजा प्रवीण टिकेकर (संस्कृतशिक्षिका, युनायटेड इं. स्कूल, चिपळूण) तृतीय क्रमांक- मीरा मनोज पोंक्षे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे) या डीबीजे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीने प्राप्त केला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेनंतर लगेच संस्कृतदिन कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. वैशाली केतकर यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले. संस्कृत ही सर्वकाही देणारी कामधेनू आहे. संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायम संस्कृतशी जोडलेले राहा असे आवाहन आपल्या भाषणात सौ. वैशाली केतकर यांनी केले. या पारितोषिक वितरण सोहोळ्यासाठी, डी.बी.जे. वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. ऋचा खवणेकर, डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. स्नेहल कुलकर्णी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. सौ. माधवी दिपक जोशी तसेच संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्या सौ. अनघा करंदीकर (चिपळूण), युनायटेड इं. स्कूल (चिपळूण) शाळेच्या संस्कृत शिक्षिका सौ. प्रीती जोशी, श्रीमती पूजा टीकेकर, एस्. पी. एम्. (परशुराम) शाळेच्या शिक्षिका सौ. भक्ती नारकर, ख्रिस्त ज्योती (वालोपे) शाळेच्या संस्कृतशिक्षिका सौ. अक्षता गांधी, डॉ. श्रीधर चितळे हायस्कूल (मार्गताम्हाने) शाळेच्या शिक्षिका सौ. भाग्यश्री अंतरकर, रोटरी इं.मी. स्कूल (खेड) शाळेचे संस्कृतशिक्षक ओंकार तांबे, न्यू इं.स्कूल (खेर्डी, चिंचघरी सती) शाळेचे संस्कृतशिक्षक पुष्कर कानिटकर, मोरेश्वर आगवेकर इं. मी. स्कूल (अलोरे) शाळेच्या संस्कृतशिक्षिका सौ. देवकी खोत, सौ. गौरी गोखले तसेच या स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थी, त्यांचे पालक, डी. बी. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी व संस्कृतप्रेमी नागरिक उपस्थित होते.













