चिपळूण (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ चिपळूण आयडियलचा भव्य शपथविधी, पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा रविवारी दि. ३० ऑगस्ट रोजी हॉटेल अथिती ग्रँड, चिपळूण येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्यात लायन राजीव कांबळे यांनी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारत चिपळूणच्या सामाजिक क्षेत्रात सेवाकार्याचे नवे पर्व सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
लायन हर्षा वाघुळदे यांनी सचिव, लायन डॉ. अविनाश चव्हाण पाटील सहसचिव, तर लायन संतोष सावंतदेसाई यांनी खजिनदार व ला. जतीन घटे सहखजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लायन्स क्लब ऑफ चिपळूण आयडियलला अधिकृत चार्टर प्रदान करण्यात आले. डिस्टीक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शहा (कासवा) PMJF यांच्या हस्ते चार्टर प्रदान करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नव्या क्लबच्या सेवाकार्याला प्रेरणादायी दिशा मिळाली. त्यानी एमजेएफ ला.जगदीश वाघुळदे यांचे विशेष कौतुक करुन भविष्यात कायम आपल्याला सहकार्य असेल असे आश्वासन दिले. लायन मंगेश दोशी PMJF यांनी इंडक्शन ऑफिसर म्हणून नव्या सदस्यांना लायन्सना सेवा शपथ दिली, तर लायन डॉ. किरण खोराटे MJF यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पाडला. या सोहळ्यास लायन ॲड. विजय जमदग्नी MJF, लायन श्रेया केळकर, रिजन चेअरमन लायन निलेश पाटील MJF, झोन चेअरपर्सन लायन डॉ. शमिना परकार MJF, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. लायन डॉ. वीरेंद्र चिखले MJF हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नागपूर हुन आलेले प्रमुख पाहुणे पी डी जी लायन चंद्रकांत सोनटक्के उपस्थित होते. समाजसेवेचा ठाम संकल्प- नव्या क्लबच्या माध्यमातून आरोग्यसेवा, शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना मदत, महिला व बालकल्याण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच गरजू रुग्णांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सावर्डे आयडीयल क्लबचे अध्यक्ष लायन डॉ. अजित गावकर MJF, सचिव लायन प्राची गोखले व खजिनदार लायन डॉ. दर्शन खोत यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “लायन्स क्लब ऑफ चिपळूण आयडियल हा केवळ एक क्लब नसून, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे सेवामंच बनेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास लायन्स सदस्य, पदाधिकारी, कुटुंबीय, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह, लायन्स सदस्यांची एकजूट आणि सेवाकार्याची ऊर्जा यामुळे संपूर्ण सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले. याचे सुत्रसंचलन ला.मिरा पोतदार व एमजेएफ ला जगदीश वाघुळदे यांनी केले तसेच सचिव ला.हर्षा वाघुळदे यांनी सर्वांचे आभार मानले.













