मसुरे | प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील श्रीमती सुगंधा गणपत कदम (82 वर्ष ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जांभवडे बौद्ध विकास सेवा संघ ग्रामिण शाखा या संस्थेचे सदस्य तथा कणकवली पंचायत समिती विस्तार अधिकारी (कृषी ) श्री.प्रकाश गणपत कदम व जांभवडे पोलीस पाटील विकास गणपत कदम यांच्या मातोश्री होत.













