पुणे : सांगवी परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लोखंडी कमान /रचना काढताना रॉड पडल्याने 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृ-त्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये जुनी सांगवी परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी डीजेचा रॅक उभारला जात होता. रॅक उभारला जात असतानाच अचानक कोसळला. यावेळी डीजे एका महिलेच्या अंगावर पडून महिला गंभीर जखमी झाली. तिथं असलेल्यांनी तात्काळ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. पण उपचारावेळी महिलेचा मृ-त्यू झाला.











