संतोष मेढेकर यांच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांच्या विश्वासाचा आठवा अध्याय;
दागिन्यांवर लाईफटाईम वॉरंटी, ‘आमच्यापेक्षा स्वस्त कुठेही नाही’चा विश्वास
स्वप्निल कदम-कुडाळ :
दागिने म्हणजे केवळ अलंकार नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणांशी जोडलेली भावनिक गुंतवणूक! याच भावनेला विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शकतेची जोड देत गेली १९ वर्षे ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ‘नक्षत्र फॅमिली ज्वेलरी’च्या आठव्या शाखेचा दिमाखदार शुभारंभ उद्या, रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी कुडाळमध्ये होत आहे. कुडाळ बस स्थानकासमोर लक्ष्मी नक्षत्र टॉवर येथे हे भव्य दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
संतोष मेढेकर यांच्या विश्वासाच्या शिल्पाला कुडाळमध्ये नवे रूप
नक्षत्र ज्वेलर्सचे मालक संतोष मेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षत्र फॅमिली ज्वेलरीने सात शाखांच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. पनवेल, महाड, रत्नागिरी, चिपळूण, सांगली, सातारा आणि कणकवली येथील यशस्वी वाटचालीनंतर आता कुडाळमध्ये आठव्या शाखेच्या रूपाने नक्षत्रचा विस्तार होत आहे.
ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य, दर्जेदार दागिने, आकर्षक डिझाईन्स आणि आपुलकीची सेवा या वैशिष्ट्यांमुळे नक्षत्र फॅमिली ज्वेलरीने आभूषण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुडाळमधील नव्या दालनात पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिक डिझाईन्सपर्यंत विविध प्रकारची आकर्षक श्रेणी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
दागिन्यांवर लाईफटाईम वॉरंटी; खरेदीनंतरही विश्वास कायम!
नक्षत्र फॅमिली ज्वेलरीच्या नव्या दालनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दागिन्यांवर लाईफटाईम वॉरंटीची सुविधा. दागिन्यांची खरेदी केल्यानंतरही ग्राहकांशी असलेले नाते आणि विश्वास कायम ठेवण्यावर संस्थेचा भर आहे.
यासोबतच ‘आमच्यापेक्षा स्वस्त कुठेही नाही’ हा नक्षत्रचा ग्राहकांसाठीचा ठाम संदेश असून, दर्जेदार दागिने योग्य दरात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे गुणवत्ता, किंमत आणि विश्वास या तिन्ही बाबींचा संगम साधणारे हे दालन कुडाळकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
शुभारंभाच्या निमित्ताने महिलांसाठी खास नजराणा!
शुभारंभाचे औचित्य साधून नक्षत्र फॅमिली ज्वेलरीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विवाहित महिलांसाठी विशेष भेटवस्तूंची पर्वणी जाहीर केली आहे. रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत या विशेष ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ४० जणांनी स्टेटस पाहिल्याचा स्क्रीनशॉट दिलेल्या क्रमांकावर पाठवायचा असून, शोरूममध्ये प्रत्यक्ष येऊन स्क्रीनशॉट दाखविल्यानंतर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. व्हॉट्सॲप ब्लॉक अथवा अन्य कारणामुळे स्टेटस पाहता न आल्यास शोरूममध्ये प्रत्यक्ष येऊन तो दाखविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
कुडाळमध्ये ‘नक्षत्र’च्या नव्या पर्वाचे स्वागत करण्याचे आवाहन
“१९ वर्षांच्या प्रवासात ग्राहकांनी दिलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. कुडाळ आणि सिंधुदुर्गातील ग्राहकांना दर्जेदार दागिने, आकर्षक डिझाईन्स, योग्य दर आणि खरेदीनंतरही विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास संतोष मेढेकर यांनी व्यक्त केला.
कुडाळ बस स्थानकासमोर गाळा नं. ४८, लक्ष्मी नक्षत्र टॉवर, कुडाळ येथे सुरू होणाऱ्या या नव्या दालनाच्या शुभारंभाला ग्राहकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘नक्षत्र’च्या कुडाळमधील नव्या पर्वाचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













