ओणमसाठी हजरत निजामुद्दीन–तिरुवनंतपुरम विशेष सुपरफास्ट रेल्वे

रत्नागिरी, थिविम, मडगावसह कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा; 23 ऑगस्टला हजरत निजामुद्दीनहून सुटणार

नवी दिल्ली : ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्तर रेल्वेने हजरत निजामुद्दीन–तिरुवनंतपुरम सेंट्रल–हजरत निजामुद्दीन आरक्षित सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे क्रमांक 04080/04079 असलेली ही विशेष गाडी ओणमच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

 

04080 हजरत निजामुद्दीन–तिरुवनंतपुरम सेंट्रल विशेष एक्स्प्रेस 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.35 वाजता हजरत निजामुद्दीनहून रवाना होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचणार आहे.

 

परतीच्या प्रवासासाठी 04079 तिरुवनंतपुरम सेंट्रल–हजरत निजामुद्दीन विशेष एक्स्प्रेस 27 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 5 वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रलहून सुटणार असून, तिसऱ्या दिवशी सकाळी 6.40 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार आहे.

 

या विशेष गाडीला महाराष्ट्रातील पलवल, मथुरा जंक्शन, कोटा जंक्शन, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, उधना जंक्शन, वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, थिविम आणि मडगाव जंक्शन यासह कर्नाटक व केरळमधील विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व थिविम तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे.

 

गाडीला कारवार, कुमटा, मूकांबिका रोड बिंदूर (H), कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, शोरनूर जंक्शन, त्रिशूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चेंगन्नूर, कायंकुलम जंक्शन, कोल्लम जंक्शन आणि वर्कला शिवगिरी या स्थानकांवरही थांबे देण्यात आले आहेत.

 

विशेष रेल्वेत एकूण 20 एलएचबी डबे असतील. यामध्ये 3-टियर एसीचे 10 डबे, स्लीपरचे 4 डबे, जनरलचे 4 डबे, एसएलआर/डीचा 1 डबा आणि जनरेटर कारचा 1 डबा यांचा समावेश आहे.

 

ओणम सणासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष रेल्वेचा लाभ घेता येणार आहे. विशेष गाडीचे सविस्तर थांबे व वेळापत्रक रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीवर उपलब्ध आहे.