लांजावासीयांना अभिमान वाटेल असे नमो उद्यान उभारनार:- आमदार किरण सामंत

एक कोटी रुपये खर्चून उभारले जाणाऱ्या
‘नमो उद्यान चे थाटात भूमिपूजन

लांजा (प्रतिनिधी): लांजा शहरात एक कोटी रुपये खर्चून उभारले जाणाऱ्या आणि शहराच्या वैभवात
भर घालणाऱ्या नमो उद्यान’ चे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी थाटात संपन्न झाले.
लांजा शहराचा वाढता विस्तार, नागरिकांची वाढती गरज आणि शहरामध्ये नागरिकांना विरंगुळा, व्यायाम तसेच आनंददायी वातावरण मिळावे, या उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे उद्यान लांजावासीयांसाठी एक सुंदर सार्वजनिक जागा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नमो उद्यानच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, लांजावासीयांना अभिमान वाटेल असे नमो उद्यान उभारले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘नमो उद्यान’च्या भूमिपूजन कार्यक्रमाला लांजा नगरपंचायतीचा नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटनेता
योगेश कावतकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप, लांजा तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ
मुन्ना खामकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, जयवंत शेट्ये, नगर सेवक वैभव जोइल, गुल्ल्या नेवरेकर, सचिन डोंगरकर, रविंद्र नागरेकर, सुधाकर कांबळे, ठेकेदार गणी मुल्लानी, सर्व नगरसेवक, लांजा वासिय, मोठ्या संख्येने उपस्थित होते.