गोपुरी आश्रमच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम
कणकवली : पावसाळ्यात दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनींसाठी सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांना आवश्यक मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात घराबाहेर पडताना छत्रीची आवश्यकता लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना मोफत छत्र्या देण्यात आल्या. यावेळी सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे, कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, दिव्यांग संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादिये, मोहन परब, दीपक दळवी, आदेश कारेकर, यल्लाप्पा पटी मनी, प्रकाश वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या गरजा ओळखून त्यांना आधार देणारे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे. सावली जनसेवा शिक्षण संस्था व गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. मोफत छत्री मिळाल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांनी सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे आभार मानत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.













