रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दाभोली हायस्कूल आणि मठ हायस्कूल येथील इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप (Ideal Study App) चे वितरण करण्यात आले.

या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास करणे अधिक सोपे होणार असून, शैक्षणिक साहित्य, विविध विषयांची माहिती व सरावासाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच लाभदायक ठरणार आहे.

या कार्यक्रमावेळी दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष ॲड. प्रथमेश नाईक, रो.पास्ट प्रेसिडेंट योगेश नाईक, खजिनदार रो.उदय दाभोलकर, रो.अनमोल गिरप,रो.संदेश कुबल, रो. दीपक ठाकूर रो. राजेश्वर डॉक्टर राजेश्वर उबाळे, तसेच इतर रोटेरियन उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना आधुनिक व डिजिटल शिक्षणाची जोड देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.