कुवारबाव येथे तरुणाची टेरेसवर केबलने गळफास घेऊन आत्महत्या

crime

रत्‍नागिरी :
शहरानजीकच्या कुवारबाव येथील तरुणाने राहत्‍या सोसायटीच्या टेरेसवरील लोखंडी अँगलला केबलने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही घटना सोमवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमारस उघडकीस आली.
शन्मुख निंबाळ (31,सध्या रा.वृंदावन सोसायटी कुवारबाव,रत्‍नागिरी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्‍याची पत्‍नी साधना निंबळ हिने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, सोमवारी सकाळी 8 वा.पर्यंत तिचा पती शन्मूख निंबाळ हा न उठल्याने ती त्‍याला उठवण्यासाठी सोसायटीच्या टेरेसवर गेली असता तिला पतीन तेथील लोखंडी अँगलला कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या काळ्या रंगाच्या केबलने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने आरडा-ओरडा करताच सोसायटीच्या इतर रहिवाशांनी टेरेसवर धाव घेतली. त्‍यांनी शन्मूखला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍याला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.