देवरुख:
साडवली पार (ता. संगमेश्वर) येथे प्राण्यांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून कसलाही परवाना नसताना बोलेरो पिकअप गाडीच्या (एमएच-१० झेड-८८६७) हौदात दोन बैल अत्यंत दाटीवाटीने आणि वेदना होईल अशा पद्धतीने दोरीने करकचून बांधले. हे बैल कत्तलीच्या उद्देशाने कासारवाडी ते मलकापूर अशी अवैधपणे नेले जात असताना साडवली पार येथे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात दोन बैल आणि पिकअप गाडीचा समावेश आहे.
Home महत्वाच्या बातम्या संगमेश्वर: बोलेरो पिकअपमधून बैलांची अवैध वाहतूक; देवरुख पोलिसांची धडक कारवाई













