कुडाळ: प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील घोटगे, कुपवडे, जांभवडे, भरणी आणि सोनवडे या गावातील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन घोटगे सरपंच चैताली ढवळ व चेतन ढवळ यांनी आयोजन केले होते. दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व सर्व सरपंच यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिव्यांग मेळावा संपन्न झाला. यामध्ये तुम्ही दिव्यांगांच्या कोणत्या सुविधा घेता का ? पेन्शन योजना सुरू आहे का ? दिव्यांग नाव व्यवसाय प्रशिक्षण, दिव्यांग विवाह सभासद नोंदणी केली आहे का? ऑनलाइन प्रमाणपत्र रेल्वे पास पेन्शन योजना स्वावलंब कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन घरघंटी, घरकुल, विवाह नोंदणी योजनेची माहिती देण्यात आली. तसेच कमी दृष्टी पॅरलेस अपघात यामुळे आलेल्या दिव्यांग व्यक्तींची नोंदणी केली. त्याचप्रमाणे ज्या दिव्यांग बांधवांची ऑनलाइन नोंदणी असून त्याचे प्रमाणपत्र नसलेल्या किंवा स्वावलंबन कार्ड तसेच युडी आयडी केवायसी करण्यात आली. तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना भेटवस्तू म्हणून चटई देण्यात आली. या कार्यक्रमासाठी घोटगे सरपंच चैताली ढवळ, जांभवडे सरपंच अमित मडव, भरणी सरपंच अश्विनी मेस्त्री, सोनवडे सरपंच प्रतीक्षा घाडी, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, भरणी पोलीस पाटील सरोज काजरेकर तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे व त्यांचे सहकारी व पंचक्रोशीतील सर्व आदी मान्यवर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ ही उपस्थित होते.













