गणेशोत्सवानिमित्त राजापूर अर्बन बँकेची ‘श्री सिद्धिविनायक समृद्धी ठेव योजना

राजापूर प्रतिनिधी:  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. राजापूरच्या वतीने ग्राहकांसाठी ‘श्री सिद्धिविनायक समृद्धी ठेव योजना’ जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसोबत आकर्षक व्याजदराचा लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत १३ महिने ते ३६ महिने कालावधीसाठी मुदत ठेव करता येणार असून, या ठेवीवर बँकेकडून ९.४५ टक्के इतका व्याजदर देण्यात येणार आहे. ही मुदतपूर्व न काढता येणारी ठेव योजना असल्याचे बँकेने नमूद केले आहे. ‘सुरक्षित गुंतवणूक, आकर्षक व्याजदर, भविष्याची खात्री’ या उद्देशाने ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर बचतीला समृद्धीची जोड देणारी ही योजना ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. सभासदांनी आमच्या बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष एड. शशिकांत सुतार व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.