विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांची राजापुरातील श्री देव धुतपापेश्वर मंदिर व राजापूर पोलीस स्थानकाला भेट

राजापूर प्रतिनिधी : राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी मंगळवारी राजापुरातील श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी श्री देव धुतपापेश्वराचे दर्शन घेत या मंदिराच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला. त्यानंतर मिना यांनी राजापूर पोलीस स्थानकाला आकस्मिक भेट देत पोलीस स्थानकाच्या कामाची पहाणी केली.
यावेळी मिना यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर पोलीसांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. महामार्गावरिल सुरक्षिततेबाबत आढावा घेत त्यांनी योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या. तर अद्याप सुरक्षिततेसाठी महामार्गावर सुरक्षा कक्ष सुरू  न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना हे मंगळवार पासून कोकण दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी राजापूर व लांजा तालुक्यात भेट दिली. राजापुरात उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी त्यांचे स्वागत केले.
राजापुरात त्यांनी श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर सुरक्षिततेबाबत कशा पध्दतीने उपाययोजना आहेत याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात आमस्मिक भेट दिली. यावेळी पोलीस स्थानकाच्या कामकाजाचा आढावा घेतला. गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर कशा प्रकारे सुरक्षा ठेवली पाहिजे, वाहतुकीचे नियोजन कसे केले पाहिजे, कोणते क्षेत्र धोकादायक आहे याचा आढावा घेत त्याबाबत उपाययोजना सुचविल्या. यावेळी त्यांनी महामार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने उभारावयच्या सुरक्षा चौक्या, पॅन्डॉल न उभारण्यात आल्याने नाराजीही व्यक्त केली. धोपेश्वर येथील पहाणी प्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते. यानंतर मिना यांनी लांजा पोलीस स्थानकालाही भेट दिली.