शिक्षणातील योगदानाला मानाचा मुजरा! उपशिक्षिका सौ. रश्मी वाडेकर यांचा गौरव

रत्नागिरी (प्रतिनिधी) :
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा, शिवार आंबेरे नंबर २, येथील उपशिक्षिका सौ. रश्मी राजन वाडेकर यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ‘जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल तसेच श्री उपशिक्षक राजन वाडेकर यांचा शिवार आंबेरे ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व मूल्यांची रुजवणूक तसेच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेले योगदान यांची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कु. अर्पिता प्रशांत सुतार, हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यातआला.तिच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन करून पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती व उपस्थित पालकांचे कौतुक करण्यात आले.
सदर कार्यक्रमास ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दयानंद लाखण सर ,कार्याध्यक्ष श्री. दिवाकर कदम,उपाध्यक्ष श्री . गोपाळ रोकडे सर ,सचिव श्री संजय मेस्त्री,खजिनदार डॉ. श्री.योगेश हातिसकर, सरपंच तथा प्रशासक श्री. राजनजी रोकडे , पोलिस पाटील श्री. सुदेश नाटेकर, उपाध्यक्ष (मुंबई) श्री. अनंत पेजे, तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री. दीपक सुतार ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. ईशा नरेंद्र मोर्ये, वाडी प्रमुख श्री अमोल सनगरे , श्री.विश्वनाथ मोर्ये, श्री. अनिल मोर्ये,श्री. प्रशांत मोर्ये,सौ.प्राची सुतार इतर ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, जि.प.शिवार आंबेरे शाळा नंबर २ ला काही दिवसांपूर्वीच आदर्श शाळा पुरस्कारही प्राप्त झाला होता. शिवार आंबेऱे गावच्या शैक्षणिक विकासात योगदान देणाऱ्या या घडामोडी ग्रामस्थ,शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उर्जा देणाऱ्या आहेत हे निश्चित