गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकतेच मोफत आरोग्य शिबिर पार पडले.जि. प. सदस्या व आरोग्य समिती अध्यक्षा अपूर्वा बरगोडे तसेच
पं.स. सदस्य श्री संदीप गोरीवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोफत आरोग्य शिबिर पार पडले.
यावेळी चिपळूण येथील अपरान्त रुग्णालयातील वैद्यकीय टीमने रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत उपचार दिले.या शिबिरामुळे येथील पंचक्रोशीमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रा आ केंद्र हेदवी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौशल्य वेल्हाळ व डॉ. चंद्रकांत कदम उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अपरान्त रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.













