गुहागर नं.1 येथे केंद्रस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत योजनांचा जागर कार्यशाळा उत्साहात

गुहागर प्रतिनिधी: 
जीवन शिक्षण शाळा गुहागर नंबर एक येथे केंद्रस्तरीय उल्हासनगर साक्षरता कार्यक्रमांतर्गत योजनांचा जागर कार्यशाळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असगोली नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे होते. त्यावेळी केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, केंद्र मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, गुहागर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे ,गुहागर नंबर 1 शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वसावे, अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक समीर गुरव,आरे भंडारवाडा शाळेचे मुख्याध्यापक किशोर वाघ, देवरहाटी शाळेचे मुख्याध्यापक मथुवेल गावित,असगोली नंबर दोन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका शिंदे, गुहागर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ईश्वर वाचावे यांनी केले. शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. त्यावेळी केंद्रप्रमुख मनोज पाटील यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ,शालेय पोषण आहार योजना, अहिल्याबाई होळकर योजना ,राजमाता जिजामाता योजना ,एकलगट बालकल्याण योजना ,अपंग शिष्यवृत्ती , अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ,उपस्थिती भत्ता योजना,राजीव गांधी अपघात विमा योजना, सुवर्ण जयंती योजना , मोफत पाठ्यपुस्तक योजना ,गणवेश योजना,या योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच पी जी आय मध्ये आपला गुहागर केंद्र सर्व मानांकने कशी पूर्ण करेल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत झगडे म्हणाले की आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी योजना पासून वंचित राहता कामा नये ,ही आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे .यासाठी सर्व शाळेने योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे. विहित कालावधीत शासनाकडे प्रस्ताव सादर केले पाहिजेत, विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असतं. योजनांचा जागर हा शासनाचा एक स्तुत्य उपक्रम आहे, सर्व शिक्षकांनी शासनाच्या विविध शासनाला योजनांचा परिपूर्ण अभ्यास करावा व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे त्यांनी आवाहन केले.