राजापुरात झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत राजापूरच्या ५३ खेळाडूंना सुवर्णपदक

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका तायक्वांदो अकॅडमीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत मुलांच्या विविध वयोगटांत ३२, तर मुलींच्या गटात २१ अशा एकूण ५३ खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली. या सर्व खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन डोंगरी विकास समितीचे सदस्य रविंद्र नागरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक सौरभ खडपे, जिल्हा परिषद सदस्य रमेश सुद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, माजी नगराध्यक्ष जमिर खलिफे, अजित घाणेकर, राज्य कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वजित लोखंडे, शशिकांत घडशी, तालुकाध्यक्ष अभिजीत तेली, उपसभापती अभिजीत गुरव आदी उपस्थित होते.
मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, उपनगराध्यक्ष विनय गुरव, तालुकाप्रमुख कमलाकर गुरव, नगरसेवक सुबोध पवार, संतोष हातणकर, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात संगम चव्हाण, यज्ञेश पेणकर, नयन फागे, युवराज पेणकर, आफजान फुलारी, नक्ष पवार, द्रोण चव्हाण, वल्लभ साळुंखे, सोहम खामकर, अधिराज कदम यांनी सुवर्णपदक मिळविले.
१७ वर्षांखालील गटात समर्थ राजेशिर्के, रितेश जाधव, आदित्य चिपळूणकर, ध्रुव नाईक, यशराज कटके, सोहम चव्हाण, आयान खान, तेजस भुवड, आयुष जाधव, दीपक साळुंखे, पार्थ गुरव, गंधर्व धने, सफदर पांगारकर यांनी सुवर्णपदक पटकावले.
१९ वर्षांखालील गटात श्लोक दाभोलकर, सार्थक खंडझोडे, दिपराज खानविलकर, सार्थक जाव्हाण, ऋतुज माटे, गीत बेलोसे, ओम सुतार, अमेय पाटील, ओंकार गोधळेकर यांनी सुवर्णपदक मिळविले.
मुलींच्या गटात आराध्या शिंदे, श्रावणी इप्ते, यज्ञा चव्हाण, तीर्था यादव, शाल्लमी आयरे, स्वर्णिका रसाळ, गार्गी बाकाळकर, स्वरा साखळकर, गौरी विलनकर, भूमी कदम, सिया सागवेकर, अझराह दळवी, ईश्वरी गोरे, शुभ्रा रामाणी, अन्वी साळवी, रितीशा कांगणे, वेदिका पवार, तिर्था चिपटे, काव्या महागावकर, शुभ्रा गुरव, मृण्मयी वायंगणकर यांनी विविध वजनी गटांत सुवर्णपदक मिळविले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत तेली, मुकेश मयेकर, संजय मांडवकर, मानसी दिवटे, संदीप राऊत, दीपक धालवलकर, प्रसाद शिवलकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.