रामपूर महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी अशोक अर्जुन जाधव बिनविरोध

चिपळूण (वार्ताहर) : रामपूर ग्रामसचिवालयात दि. २ रोजी प्रशासक शिंदे, ग्रामसेवक शेंडगे, सरपंच अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा झाली. त्यात रामपूर केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी रामपूर बौद्धवाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक अर्जुन जाधव यांचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी नाव सुचित केले. सर्वानुमते बिनविरोध निवड अशोक अर्जुन जाधव यांची झाली.
त्यांचे अभिनंदन केदारनाथ सेवा मंडळ रामपूरचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सर्व पदाधिकारी, सुहास चव्हाण, दिपक शिरकर, माजी सभापती जितेंद्र चव्हाण, रामपूर प.स. गण सदस्य गौरव पाटेकर, शरद जाधव,धर्मदास मोहिते, यशवंत मोहिते, दिपक जाधव, विशाल मोहिते, अजय जाधव, राजेश जाधव, रामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, पोलीस पाटील बंटी चव्हाण, सुधाकर चव्हाण यांनी खास अभिनंदन केले आहे.