चिपळूण (वार्ताहर) : दि. १२/९/२६ सोमवार दि. १४/९/२६ राष्ट्रभाषा हिंदी दिन आहे. १९४९ साली राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य काकासाहेब कालेलकर, गोपालदास सक्सेना यांची राष्ट्रभाषेसाठी कमिटी नियुक्त केली होती. १४ सप्टेंबर १९५० पासून भारताची राष्ट्रभाषा हिंदी म्हणून संविधानात मान्यता दिली. परंतु काहींना वाटते देशाची प्रमुख राज्यभाषा हिंदी आहे. भारतात ८० कोटी जनता हिंदी भाषा बोलते. सामान्य नागरिकांची भाषा हिंदी आहे. हिंदी ही विश्व भाषा बनली असून सुमारे २०० राष्ट्रांमधून किमान १ अब्ज लोक हिंदी भाषा बोलतात. हिंदी भाषा भारताच्या प्राणवायू आहे.
महाराष्ट्रात मराठी मातृभाषेचा सन्मान करताना, हिंदी भाषेचाही आदर केला पाहिजे. कोणत्याही भाषेचा द्वेष करता कामा नये. सर्व भारतीयांना, हिंदी भाषा बोलणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थी, शिक्षक, पालक, हिंदी शिक्षक, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक संघटना, विभाग, जिल्हा, तालुका हिंदी संघटना यांना महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे माजी अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी १४ सप्टें. राष्ट्रभाषा हिंदी दिन, गणपती सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. “हिंदी पढ़ो, आगे बढ़ो, भारत जोड़ो”













