परशुराम बाल विद्यालय बुरंबाड येथे १६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड वरचा वठार येथे असलेल्या परशुराम बाल विद्यालयात १६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता माजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा,’माजी विद्यार्थी संघ,परशुराम बाल विद्यालय यांचे तर्फे आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष श्री अभिजित सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे.
या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.गणेशोत्सवात मुंबई ,पुणे येथून नोकरी व्यवसायनिमित्त वास्तवव्यास असलेले अनेक माजी विद्यार्थी गावात हजार असतात.यामुळे सर्वांना मेळाव्याला हजर राहता यावे म्हणून हा मेळावा गणेशोत्सवात आयोजित केला असल्याचे अध्यक्ष अभिजित सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले परशुराम बाल विद्यालय ही जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा आहे.यामुळे या विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.बुरंबाड नंबर २ शाळा हिच परशुराम बाल विद्यालय म्हणूनच ओळखली जाते.
मेळाव्या निमित्त माजी विद्यार्थ्यानी शाळेत उपस्थित राहावे,विचारांचे आदान प्रदान व्हावे व शाळेच्या सर्वांगीण विकासावर चर्चा व्हावी यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.