वेंगुर्ले । प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष, सन्माननीय श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आडेली पंचायत समिती गणात सामाजिक बांधीलकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला. आडेली पंचायत समिती सदस्य तथा भाजप ओबीसी मोर्चाचे उपजिल्हाप्रमुख श्री. नितीन मांजरेकर यांच्या पुढाकाराने परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना साड्या व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करून वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्री. नितीन मांजरेकर यांनी श्री सोमेश्वर चरणी प्रार्थना करत प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांना उदंड, निरोगी व सुखी आयुष्य लाभावे आणि त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीस उज्वल यश मिळावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
या सामाजिक उपक्रमाला आडेलीचे सरपंच श्री. यशस्वी कोंडसकर, भाजप बूथ अध्यक्ष श्री. तात्या कोंडसकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुधीर धुरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. अविनाश तोरसकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रवीण गडेकर, श्री. मारुती वाघे, श्री. उत्तम धरणे, श्री. जक्कुलवाड गुरुजी आणि श्रीयुत आरोलकर या मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सौ. अश्विनी जामदार, सौ. रीती सोनसुरकर, सौ. नीता सोनसुरकर, सौ. प्राची वाघे, सौ. माधुरी वाघे, सौ. प्रणाली धरणे, सौ. कांचन शेणई, सौ. उमा शेणई, सौ. समीक्षा एरम, सौ. स्वाती पावस्कर, सौ. नेत्रा होडावडेकर, सौ. संचिता सुकळवाडकर, सौ. पेडणेकर आणि सौ. तारामती गवस यांच्यासह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून महाराष्ट्राची निरंतर सेवा घडत राहो आणि वेंगुरल्याच्या रामेश्वराने त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावे, अशी प्रार्थना सर्वांनी मिळून केली.










