श्री गणरायाचे दर्शन घेत कार्यकर्त्यांशी साधला संवाद
वैभववाडी प्रतिनिधी :
दरवर्षीप्रमाणे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले.
नितेश राणे यांनी कोकीसरे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर वैभववाडी पोलीस ठाणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव व श्री. आगा यांच्याशी चर्चा केली.
वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही नितेश राणे यांनी भेटी दिल्या. मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंडळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विविध गणेशोत्सव मंडळांच्या वतीने नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी संचालक दिगंबर पाटील, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, उद्योजक विजय तावडे, प्राची तावडे, नेहा माईनकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री. आगा, अंकित सावंत, राजेश गजोबार, उत्तम निकम, रवींद्र तांबे, राजन तांबे, गणेश मोहिते, मारुती मोहिते, मंगेश चव्हाण, संजय चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












