पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले अभिनंदन
समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी दिल्या शुभेच्छा
कणकवली : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत साहेबान्ना इंगळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली.
यावेळी ना. नितेश राणे यांनी शशिकांत इंगळे यांचे अभिनंदन करून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
गोंधळी समाजाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देतानाच समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस ना. नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर समाजातील विविध घटकांना एकत्रित घेऊन समाजाच्या विकासासाठी काम करण्याचा मानस असल्याचे शशिकांत इंगळे यांनी सांगितले. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. समाजबांधवांच्या अडचणी समजून घेत त्यावर सकारात्मक पद्धतीने काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे श्री. इंगळे यांनी सांगितले.











