बांदा : प्रतिनिधी
राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बांद्याच्या बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
सोबत जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, गांधी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष भाऊ वाळके, उपाध्यक्ष निलेश कदम, अर्णव स्वार, उद्योजक नितीन सावंत, प्रसाद वाळके, दर्पण आळवे, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, भाजपा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी अध्यक्ष बाबा काणेकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, माजी सरपंच दीपक सावंत, सोहम सावंत, साई धारगळकर, राकेश केसरकर आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज १८च्या गणेश सजावट स्पर्धेत मंडळाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ना. नितेश राणे यांच्या हस्ते मंडळाचा सत्कार करण्यात आला.









