शक्तितुरा रंगला; मंडणगडात कलगीतुऱ्याची रंगतदार जुगलबंदी

शाहीर सचिन कदम यांच्या ‘शक्तीवाले’ आणि शाहीर ऋषिकेश बिरवाडकर यांच्या ‘तुरेवाले’ यांच्यात रंगली संगीतप्रेमींची मैफल

मंडणगड प्रतिनिधी  :
मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाच्या वतीने आयोजित कुणबी भवन सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ अंतर्गत २० सप्टेॅबर २०२६ रोजी शहरातील येथील कुणबी भवन येथे कलगीतुरा या संगीतामय सामन्याचे आयोजन करण्यात आले. शास्त्र व पुराणांच्या आधारे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रंगलेल्या या पारंपरिक जुगलबंदीने उपस्थित रसिकांची दाद मिळवली.
या कार्यक्रमात शाहीर सचिन कदम यांच्या ‘शक्तीवाले’ आणि शाहीर ऋषिकेश बिरवाडकर यांच्या ‘तुरेवाले’ या दोन कलापथकांनी सहभाग घेतला. दोन्ही बाजूंनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून, सवाल-जवाबातून तसेच पारंपरिक कलगीतुऱ्याच्या माध्यमातून रंगत वाढवली. मधुर स्वर, प्रभावी सादरीकरण आणि उत्स्फूर्त जुगलबंदीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ‘मजुळ स्वरांचा राजा’ म्हणून परिचित असलेल्या शाहीर सचिन कदम यांच्या शक्तीवाल्यांनी दमदार सादरीकरण केले. तर ‘मधुर स्वरांचा नवांकुर’ अशी ओळख असलेल्या शाहीर ऋषिकेश बिरवाडकर यांच्या तुरेवाले पथकानेही आपल्या कलाविष्काराने रसिकांची मने जिंकली.
कलगीतुरा ही कोकणच्या लोकजीवनाशी जोडलेली पारंपरिक लोककला असून, कोकणची लोककला, परंपरेचा वारसा आणि आपली कला या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या पिढीसमोर या पारंपरिक कलाप्रकाराचे प्रभावी सादरीकरण झाले.
कार्यक्रमाला गणेशभक्त, कलाप्रेमी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास समाज नेते भाई पोस्टुरे निवृत्त पोलीस अधिकारी रमेश घडवले यांची विशेस अपस्थित लाभली कुणबी सेवा संघाच्या पदाधिकारी विजय ऐनेकर रघुनाथ पोस्टुरे सचिन माळी सुरेश पोस्टुरे व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.मंडणगड दुर्गवाडी येथे – शक्तितुरा रंगला; कलगीतुऱ्याची रंगतदार जुगलबंदी मंडणगड तालुका कुणबी समाज सेवा संघाचेवतीने आयोजन
मंडणगड दुर्गवाडी येथे – शक्तितुरा रंगला; कलगीतुऱ्याची रंगतदार जुगलबंदी मंडणगड तालुका कुणबी समाज सेवा संघाचेवतीने आयोजन