रत्नागिरी झाडगाव परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या झाडगाव परिसरात अमली पदर्थाचे सेवन करणाऱ्या संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वा.सुमारास करण्यात आली.
अलिमियाँ अमिन गावखडकर (35,रा.शेट्येनगर झाडगाव एमआयडीसी,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात पोलिस हवालदार सुहास बोराटे यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार,सोमवारी रात्री संशयित हा एमआयडीसी झाडगाव परिसरातील अल्ट्राटेक कंपनीच्या मागील गेटजवळ झुडपाच्या आडोशाला गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आला.