दाभोली इंग्लिश स्कूल द्वितीय तर पाटकर हायस्कूल तृतीय..
वेंगुर्ले : दाजी नाईक
रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत श्री देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे ने बाजी मारली आहे.
“महासागराचे पुनरुज्जीवन : पिढ्यांचे जतन” या विषयावर आधारित वेतोरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी सादरीकरण केले. महासागरातील प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्याचा सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम या विषयाला त्यांनी नाट्यमय स्वरूपात मांडून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
प्रथम क्रमांक – श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, द्वितीय क्रमांक – दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली, तृतीय क्रमांक – रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला यांनी मिळविला.
प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे वेतोरे शाळेच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समिती चे कार्याध्यक्ष श्री. दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष श्री. सुर्याजी नाईक, कार्यवाह श्री. प्रभाकर नाईक. सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक श्री. के.डी. खरबडे, आणि सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी लेखिका सौ. ओवी पवार, दिग्दर्शक श्री. निलेश पेडणेकर आणि सर्व कलाकार विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.












