भिवंडी : शहापूर तालुक्यातील वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान जिंदाल कंपनीजवळ रेल्वेतून पडून २५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चित्रा प्रतीक देसले असे मृत महिलेचे नाव असून, त्या सोगाव-किनवली परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रेल्वेतून पडल्याने चित्रा देसले गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर वासिंद-आसनगाव रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलेचा रेल्वेतून नेमका कशामुळे पडल्या, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.












