मुणगे येथे २१ दिवशीय गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर :श्री भगवती देवस्थान समिती, मुणगे ता. देवगड यांच्या वतीने २१ दिवशीय गणेशोत्सवच्या निमित्ताने श्री देवी भगवती मंदिर, मुणगे येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ सप्टेंबर २०२६ रात्री ९.३० वाजता

आंबा बागायतदार संघटना मुणगे पुरस्कृत, जि.प.पू. प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातवण यांच्या १४ गीतांवर विद्यार्थ्यांचा चित्तवेधक ‘समई नृत्याविष्कार’.

२८ सप्टेंबर रात्री ९.३० वाजता

श्री माऊली वारकरी दिंडी पथक मोर्वे यांचे ‘दिंडी भजन’. ३० सप्टेंबर दुपारी ३.३० वाजता विठ्ठलादेवी दशावतारी नाट्य मंडळ राठीवडे, सुतारवाडी प्रस्तुत ‘ब्रम्हलिखित’ हे महान पौराणिक दशावतार नाट्यपुष्प.०२ ऑक्टोबर रोजी

सकाळी १०.०० वाजता: श्री सत्यनारायणाची महापूजा.

रात्री ९.०० वाजता: श्री देवी भगवती देवस्थान व समस्त मुणगे ग्रामस्थ आयोजित ‘आमने सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना’ बुवा श्री. केदार कदम (ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ उपळे)

विरुद्ध बुवा श्री. व्यंकटेश नर (श्री जिनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडील)

विरुद्ध बुवा श्री. कृष्णा कदम (स्वर शक्ती साधना भजन मंडळ काळसे)यांच्यात होणार आहे.

०४ ऑक्टोबर रोजी

दुपारी १.३० वाजता: श्रीं ची भव्य मिरवणूक.

सायंकाळी ५.३० वाजता: आडवळवाडी समुद्र किनाऱ्यावर विसर्जन.

या महोत्सवात सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.